About Us
वास्तुशांती सोहळा

नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी भरभराटीसाठी व आशीर्वादासाठी ही पूजा केली जाते. गणेश पूजन, होम हवन, गृहप्रवेश असे एकूण १२ विधी यामध्ये केले जातात. शास्त्रानुसार पूजा करण्यासाठी वंदन विश्वासार्ह नाव मानले जाते म्हणूनच २०२५ मध्ये महाराष्ट्रात आम्ही सर्वाधिक पूजा केल्या आहेत.
सर्व सामग्रीसह दक्षिणा: रु १४,५००/-

4.8

संपूर्ण विधीबद्दल माहिती
  • पूजेची सुरुवात करण्यापूर्वी शरीराला, मनाला शुद्ध केले जाते. त्यासाठी आचमन-प्राणायाम केले जाते.
  • त्यानंतर संकल्प केला जातो, ज्यामध्ये देवांना आमंत्रित करून मनातील इच्छा व्यक्त केल्या जातात.
  • सर्वप्रथम गणेश पूजन करून नवीन कामाचे शुभारंभ केले जाते (प्रारंभ), त्यानंतर वरूण देवतेचे पूजन करून वातावरण पवित्र केले जाते.
  • कुलदैवताची कृपा मिळावी म्हणून मातृका पूजन केले जाते. स्वर्गीय पितरांचे नांदी-श्राद्ध करून पूर्वजांचे स्मरण व सन्मान केला जातो.
  • दिग्रक्षण करून पंचगव्य व ब्राह्मण पूजन केले जाते (संरक्षण), नंतर वास्तुमंडळ देवता स्थापन करून घरातील ऊर्जा संतुलित केली जाते.
  • नवग्रह पूजन केले जाते (सामंजस्य) आणि रुद्रमंडळ देवतेची स्थापना करून घरात शक्ति व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते(शक्ति).
  • घरातील गृहलक्ष्मी घरात प्रवेश करते व सर्व सकारात्मकता त्या रूपाने घरात येते.
  • शेगडी ची पूजा करून दूध उतू जाऊ दिले जाते, होम हवन करून पूर्ण आहुती दिली जाते (शांती). शेवटी ध्यान करून आणि आरतीने पूजेचा समारोप केला जातो (समापन).

संपूर्ण विधी अंदाजे ३ ते ४ तास चालतो.

पंचांगानुसार उत्तम मुहूर्त
महिना मुहूर्त तारीख
जानेवारी २०२६ १, ५, ७, २४, २६, २८
फेब्रुवारी २०२६ ६, ७, १३, २०, २३, २६, २८
मार्च २०२६ ५, १४, १६
एप्रिल २०२६ २०, २३, २४, २९
मे २०२६ १, ४, ६, ८, ९, ११, १३, २४
जून २०२६ १७, २२, २४, २७
जुलै २०२६ २, ४, ८, ९, ११
ऑगस्ट २०२६ १९, २०, २६, २८
सप्टेंबर २०२६ ४, ७
ऑक्टोबर २०२६
नोव्हेंबर २०२६ ११, २०, २२, २५, २६, २८
डिसेंबर २०२६ ३, ४, ५, २०, २२, २४, २९, ३०
वंदन बद्दल अधिक माहिती
वंदन ही संस्था आम्ही आपला सनातन धर्म जतन ठेवावा, त्याची वृद्धी व्हावी या हेतूनें चालू केली आहे. आजच्या युगात आपल्या वेदांमध्ये असणाऱ्या अनेक संस्कारांचा, विधींचा लोप होत चालला आहे, लोक त्याकडे एक अंधश्रद्धा म्हणून पाहात आहेत.

या विधींचं आपल्या आयुष्यात शांती व समाधान निर्माण करण्यासाठी अनन्यसाधारण महत्व आहे. या परिस्थितीसाठी आपण सर्वच जबाबदार आहोत, गेली कित्येक वर्षे आपण फक्त विधी करत आलो पण त्या प्रत्येक विधीचा अर्थ आपण कधी समजूनच घेतला नाही.

यासाठी आम्ही वंदन हा उपक्रम सुरु केला आहे – फक्त पूर्ण नाही तर अर्थपूर्ण पूजा हे वंदनचे मुख्य ध्येय आहे.

आपली प्रत्येक पूजा केवळ एक विधी न रहाता, मनाला समाधान देणारा एक भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव ठरावा हा आमचा प्रयत्न. प्रशिक्षित पंडित, अर्थपूर्ण मार्गदर्शन आणि संपूर्ण चिंतामुक्त नियोजन ,यामुळेच २०२५ मध्ये ‘वंदन’ महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर आहे.

भारताचा समृद्ध आध्यात्मिक वारसा जपत, तो तरुण पिढीसाठी अधिक सुलभ, समर्पक, सहज स्वीकारार्ह बनवणे हे वंदनचे मुख्य ध्येय आहे.
Talk to Pandit
Chat with us on WhatsApp